जैविक शेतीAnand 4 You
जाणून घ्या, स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक बाबत
जीवाणू खते संवर्धन स्फुरद विरघळविणारे जिवाणू Phosphate Solubilizing Bacteria PSB Biofertilizer निसर्गात स्फुरद मुक्त स्वरूपात आढळून येत नाही. परंतु ते अविद्राव्य अशा रासायनिक स्वरूपात मातीमध्ये आढळते. फक्त २० ते २५ टक्के स्फुरद पिकांना उपलब्ध होते. उर्वरित ८० ते ७५ टक्के स्फुरद जमिनीत स्थिर होते जे पिके घेऊ शकत नाहीत. स्फुरद विरघळविणारे जिवाणू (पीएसबी) जसे बॅसिलस मेगाटेरीएम व सुडोमोनास फ्लुरोसन्स अविद्राव्य स्वरूपातील स्फुरदचे विद्राव्य स्वरूपात रूपांतरण करून पिकास स्फुरद उपलब्ध करून देतात. स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक खतांच्या वापराने झाडांची मुळे जोमदार वाढून पाणी आणि पोषक तत्वाचा शोषणाचा वेग वाढवितो परिणाम उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होऊ शकते. याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पूर्ण बघा
संदर्भ:- आनंद फॉर यु हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
153
0
संबंधित लेख