हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
महाराष्ट्रातील तापमानात लक्षणीय वाढ
• महाराष्ट्रातील नगर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यात या आठवड्यात पॅरा ४४ अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. कोकण:- कोकणातील सर्वच जिल्ह्यात किमान तापमान २५-२६ अंश सेल्सिअस ते कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस राहील. तसेच आकाश अंशतः ढगाळ राहील सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक १२ एप्रिल रोजी १२ मि.मी व दिनांक १४ एप्रिल रोजी ४ मि.मी पावसाची शक्यता आहे. 1) मराठवाडा:- बीड व औरंगाबाद जिल्ह्यात कामात तापमान ४० अंश सेल्सिअस, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस या जिल्ह्यात ४१-४२ अंश सेल्सिअस तापमान राहील. 2) पश्चिम विदर्भ:- वाशीम जिल्ह्यात तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. पावसाची शक्यता कमी आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४५-५०% राहील. 3) दक्षिण पश्चिम महाराष्ट्र:- सांगली, सातारा, सोलापूर व पुणे व नगर जिल्ह्यात तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. परंतु हवामान अत्यंत कोरडे राहील. हवामानाचा अंदाज पाहता या आठवड्यात कमला व किमान तापमानात लक्षणीय वाढ होईल त्यामुळे पिकांची व जनावरांची पाण्याची गरज वाढेल त्यांना गरजेनुसार पाणी द्यावे २) जनावरांना उन्हात बंधू नये. ३) शेतातील अंग मेहनतीची कामे सकाळी करावी. ४) फळबागांना आच्छादन करावे. ५) पिकांना पाणी ठिबक सिंचनाद्वारे द्यावे व पाण्याच्या पाळीतील अंतर कमी करावे._x000D_ संदर्भ -डॉ रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ)_x000D_ हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा._x000D_
217
0
संबंधित लेख