हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
पावसाची शक्यता तापमानात वाढ
या आठवड्यात महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतके हवेचे दाब राहतील मात्र पूर्व किनारपट्टीवर हवेचे दाब १००८ हेप्टापास्कल इतके कमी राहतील त्यामुळे वारे मोठ्या प्रमाणावर त्या कमी हवेच्या दाबाचे क्षेत्रात ढग वाहून आणतील व पाऊस होईल हा पाऊस पूर्व मशागतीचे कामांना उपयुक्त ठरेल. मात्र उभ्या द्राक्ष,डाळिंब, भाजीपाला व इतर तृणधान्य व कडधान्य पिकांना काढणीस आल्याने अपायकारक ठरू शकते. व नुकसानीकारक होऊ शकते. पश्चिम विदर्भ,मराठवाडा दक्षिण पश्चिम महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्रसह दक्षिण कोकणात होऊ शकेल असे सध्याचे हवामान असून संपूर्ण भारतात हवेचे दाब कमी झाले असल्याने महाराष्ट्रातील ऊस पिकास हा पाऊस उपयुक्त ठरू शकेल. तसेच काढणी केलेले धान्य व हळद उघड्यावर ठेवल्यास नुकसान होईल. संदर्भ -डॉ रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ)
357
10
संबंधित लेख