AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
21 Mar 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
मेथी आणि कोथिंबीर पिकातील मर रोगाचे व्यवस्थापन
मेथी व कोथिंबीर पीक उगवणीनंतर जमिनीतील बुरशीमुळे मूळकूज व खोड कूज ह्या समस्या येऊन रोपांची मोठ्या प्रमाणात मर होऊन नुकसान होते. यावर उपाययोजना म्हणून पेरणी नंतर लगेच ट्रायकोडर्मा @ २ किलो व सुडोमोनास @ २ किलो चांगल्या कुजलेल्या शेणखत मिक्स करून प्रति एकर जमिनीतून द्यावे व उन्हाचा ताण पिकावर पडू नये यासाठी पिकास वापसा राहील यापद्धतीने पाणी द्यावे. जेणेकरून पीक उगवणीनंतर मर रोगाची समस्या येणार नाही व पिकाची जोमदार वाढ होईल.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
7
0