AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
20 Mar 20, 05:00 PM
हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
पूर्व विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता
महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील हवेचे दाब कमी होत असून सामान ११० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा , गोंदिया तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली,सातारा या भागात पावसाची शक्यता आहे.हवामान बदलाच्या प्रभावामुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही काही भागात ढगाळ हवामान आणि पावसाची शक्यता आहे.हवामान बदलाचा आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे वाढत असलेले तापमान ते बाष्प निर्मितीस अनुकूल ठरत आहे. तसेच या आठवड्यात कमाल तापमानातही वाढ होईल. संदर्भ - रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
3
0