AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
17 Mar 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
पपई पिकातील महत्वाचे पाणी व्यवस्थापन
पपई पिकाच्या झाडाची मुळे जास्त खोलवर जात नसल्यामुळे उन्हाळ्यात पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे अन्यथा पिकास पाणी कमी पडल्यास झाडाची वाढ न होणे, फुलगळ होणे तसेच फळांचा विकास न होणे या समस्या मोठ्या प्रमाणात येतात. याउलट पिकास अतिरिक्त पाण्याचा वापर केल्यास जमिनीतील जास्त ओलाव्यामुळे पपई पिकाचे खोड पोकळ असल्याने खोडकूज व मूळकूज ह्या समस्या आढळून येतात. यामुळे पिकास ठिबक नसल्यास जमिनीच्या प्रकारानुसार ५ ते ६ दिवसांच्या अंतराने १४ ते १५ लिटर पाणी प्रति झाड याप्रमाणे द्यावे. ठिबक असल्यास जमिनीत वापसा राहील यापद्धतीने पाण्याचे नियोजन करावे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
67
8