AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
16 Mar 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
टोमॅटो पिकातील अन्नद्रव्ये व्यवस्थापन
पिकात फळांच्या गुणवत्तेसाठी व फुगवणीसाठी मुख्य आणि दुय्यम अन्नद्रव्यामध्ये पालाश(३९ %), नत्र (२५ %), आणि कॅल्शिअम (२५ %),अन्नद्रव्याची गरज जास्त भासते तसेच स्फुरद (४ %) व मॅग्नेशिअम(७%) तुलनेत कमी लागते. परंतु पिकात वाढीच्या अवस्थेपासून खतांचे व पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. यासाठी पीक लागवड करताना डीएपी, एमओपी,कॅल्शिअम नायट्रेट, मॅग्नेशिअम सल्फेट यांसारख्या खतांचा वापर बेसल डोस मध्ये करावा. तसेच ठिबक असल्यास विद्रव्ये खते पिकाच्या गरजेनुसार नियमित द्यावीत जेणेकरून तिरंगा, शेंड्याच्या बाजूने फळ कुजणे ह्या समस्या येणार नाही
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
31
2