AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
15 Mar 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
पेरू पिकातील छाटणी नियोजन
महाराष्ट्रात पेरू पिकात प्रामुख्याने दोन बहार हंगाम आहेत. पहिला वसंत ऋतू सुरु होण्यापूर्वी. त्यालाच आंबे बहार देखील म्हणतात यामध्ये फेब्रुवारी ते मार्च मध्ये बागेत छाटणी करून फुलबहार घेतला जातो व पावसाळ्यात जुलै ते सप्टेंबर च्या दरम्यान फळांची काढणी केली जाते. दुसरा मृग बहार यामध्ये जुन ते जुलै च्या दरम्यान फुल बहार धरून नोव्हेंबर ते जानेवारीच्या दरम्यान फळे काढली जातात. आत्ता आंबे बहार धरण्यासाठी बागेत छाटणी करून बहार नियोजन करावे. एप्रिल ते मे च्या दरम्यान तापमान जास्त असल्यामुळे छाटणी करणे टाळावे. छाटणी करताना जाड फांद्या ठेऊन बाकीच्या सर्व बारीक काड्या काढून टाकाव्यात झाडाच्या मुख्य खोडापासून आलेल्या चार ते पाच उपयुक्त फांद्या आणि त्यानंतर आलेल्या लहान फांद्या अशा प्रकारे उघडलेल्या छत्रीच्या आकाराप्रमाणे छाटणी करून खतांचे व पाण्याचे संतुलित नियोजन करावे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
48
5