AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
13 Mar 20, 05:00 PM
हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
राज्यात ढगाळ हवामान व पावसाची शक्यता
महाराष्ट्रासह दक्षिण भारतावर समान १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. तसेच त्यात १६ मार्च रोजी बदल होऊन हवेचे दाब १००८ हेप्टापास्कल इतके कमी होऊन विदर्भासह महाराष्ट्रात ढगाळ वातावरण तयार होऊन.उत्तर कोकण,उत्तर महाराष्ट्र,मराठवाडा , पश्चिम महाराष्ट्रत १५ ते १७ मार्च या काळात पावसाची शक्यता निर्माण होईल. ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.अवकाळी पावसामुळे वातावरणातील बदल व त्याचे उन्हाळी हंगामावर होणारे परिणाम पाहता या तीनही हंगामावर हवामान बदलाचा परिणाम झाल्याचे चित्र आहे.हवामान बदलाचे प्रभावामुळे मानवी आरोग्यासह पिकांचे व जनावरांच्या आरोग्यासह परिणाम होत असून महामारी सारख्या रोगांसह हवामानात बदल व वातावरणात बदल हे जंतुच्या वाढीस अनुकूल बनत आहे. संदर्भ - रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
जर हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक व शेअर जरूर करा
8
7