AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
09 Mar 20, 10:00 AM
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आंबा मोहोर संरक्षण
आंबा मोहोराची काळजी: आंब्याच्या झाडांना मोहोर फुटण्याची क्रिया साधारणपणे डिसेंबरच्या दुसर्या पंधरवड्यापासून सुरू होते आणि ती जानेवारी अखेरपर्यंत चालू राहते. क्वचित प्रसंगी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी मोहोर येतो. परंतु या वर्षी उशिरा झालेल्या पावसाने मोहोर येण्याचा कालावधी पुढे ढकलला आहे, जानेवारी मध्ये मोहोर येण्याला सुरवात होऊन फेब्रुवारीच्या अखेर पर्यंत राहील आसा अंदाज आहे. आंबा मोहोराची काळजी म्हणून तुडतुडे, कोळी, मिजमाशी, पिठ्या ठेकूण इ. किडी तसेच करपा, भुरी इ.रोगांचा प्रादुर्भाव कमी करणे आवश्यक आहे. मोहोर फुटल्यानंतर जर फवारणी केली तर किडीचे नियंत्रण करणे अवघड जाते. मोहोराचे संरक्षण करण्यासाठी पुढील दाखविल्याप्रमाणे किटकनाशकांचा वापर करावा. 1. पहिली फवारणी (पोपटी रंगाच्या पालवीवर मोहोर येण्यापूर्वी) - डेल्टामेथ्रीन 2.8% ईसी – 0.5 मिली प्रति लिटर पाणी, 2. दुसरी फवारणी (बॉंगे फुटताना ) - लॅम्बडा सहालोथ्रीन 5% ईसी 0.5 मिली आधिक हेक्साकोनॅझोल 5% ईसी 1 मिली लिटर पाणी. 3. तिसरी फवारणी ( दुसऱ्या फवारणी नंतर १५ दिवसांनी ) - इमिडाक्लोप्रिड 17.8 % एस एल – 0.4 मिली आधिक कार्बेनडीझम 12% + मॅन्कोझेब 63% डब्ल्यू पी - 2 ग्रॅम. लिटर पाणी. 4. चौथी फवारणी (तिसऱ्या फवारणी नंतर 15 दिवसांनी ) थायोमेथोक्साम 25% डब्ल्यू जी 0.5 ग्रॅम अधिक झिनेब 68% + हेक्साकोनॅझोल 4% डब्ल्यू पी 2 ग्रॅम लिटर पाणी. फळमाशी: फळमाशी प्रति हेक्टरी 4 – 5 फेरोमेन ट्रॅप (कामगंध सापळे) समान अंतरावर लावावे म्हणजे नर फळमाशांचे नियंत्रण झाल्याने पुढील पिढी तयार होत नाही. पुन्हा पुन्हा येणारा मोहोर टाळण्यासाठी पहिला पुरेसा मोहोर आल्यावर जिब्रेलिक आम्लाच्या 50 पीपीएम तीव्रतेच्या द्रावणाची फवारणी करावी. पहिल्या फवारणी नंतर 15 दिवसांची पुन्हा फवारणी करावी. अशा पद्धतीने व्यवस्थापन केल्यास उत्पादकता तसेच उत्पादनाचा दर्जा सुधारण्यास नियमितपणे मदत होते. संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
8
6