किडींचे जीवनचक्रकोप्पेर्ट बायोलॉजिकल सिस्टम्स
ब्लॅक वाईन विव्हिल (भुंगा) किडीचे जीवनचक्र
• हि कीड शोभेच्या वनस्पतींबरोबरच स्ट्रॉबेरी आणि इतर फळ पिकांमध्ये देखील आढळतात. हि कीड सुमारे ७ - १० मिमी लांब, तपकिरी रंगाची असून पाठीवर हलके पिवळे डाग असतात. • या किडीच्या पतंगास (प्रौढ) रसायनिकरित्या नियंत्रित करणे अवघड आहे, केवळ त्यांच्या अंतर्गत सवयीमुळेच नव्हे तर, हे बर्याच कीटकनाशकांचा प्रतिकार देखील करतात. प्रौढ भुंगा आणि अळी दोन्ही पिकाचे नुकसान करतात. • भुंगे फक्त रात्री सक्रिय असतात, पाने कडांपासून खाण्यास सुरुवात करतात. पहिल्या वर्षी मादी १०० ते कित्येक हजार अंडी देण्यास सक्षम असते. अंड्यापासून उबविलेली अळी सर्वात नुकसान होते. • लहान अवस्थेतील अळी प्रथम सेंद्रिय मातीचे कण खातात, त्यांची जितकी जास्त वाढ होते तितके ते जाड मुळे खाऊन पिकांच्या खोडावर देखील प्रादुर्भाव करतात. • अळी कोषावस्थेमध्ये रूपांतरित होते, प्रौढ मादीचा जीवन कालावधी ५ ते १२ महिने असतो तर काही प्रौढ ३ वर्ष किंवा त्याहून अधिक जीवन कालावधीचे असतात. संदर्भ:- कोप्पेर्ट बायोलॉजिकल सिस्टम्स हा उपयुक्त व्हिडीओ आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
27
0
संबंधित लेख