AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
02 Mar 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कारली, दोडका, भोपळा यांसारख्या वेलवर्गीय पिकातील आंतर मशागत
कारली, दोडका, भोपळा, काकडी यांसारख्या वेलवर्गीय पिकातील सुरुवातीला वेल वाढीच्या अवस्थेत २ ते ३ फूट वाढ होईपर्यंत एकच मुख्य शेंडा ठेवावा. त्यानंतर पुढे पिकात मांडव करावा व वेलींना आधार देऊन बाकीचे फुटवे ठेवावे. जेणेकरून पिकात पुरेसा सूर्यप्रकाश, खेळती हवा राहिल्यामुळे वेलींची जोमदार वाढ होते. त्याचबरोवर फळांची तोडणी चालू असताना वेलींची खालची जुनी पिवळी पडलेली तसेच किड व रोगग्रस्त पाने नियमितपणे काढून टाकावीत जेणेकरून जुन्या पानांना जाणारे अन्नद्रव्ये फळांच्या विकासासाठी वापरले जातील व फळांची गुणवत्ता सुधारेल.
जर हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक व शेअर जरूर करा
410
3