AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
01 Mar 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
उन्हाळी मिरची पिकाचे लागवडीचे नियोजन
मिरची पिकाच्या जास्तीत जास्त तसेच गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी लागवडीचे नियोजन करणे महत्वाचे आहे. उन्हाळी मिरची लागवडीसाठी 30 ते 35 दिवसांच्या वयाची निरोगी रोपे निवडावी. तसेच लागवडीसाठी 1 मीटर रुंदीचा व 1 फूट उंचीचा बेड तयार करावा तसेच दोन रोपांच्या ओळींमधील मधील अंतर ४ ते ५ फूट ठेवावे व बेड मध्ये संतुलित खतांची मात्रा द्यावी. त्यानंतर बेड पाण्याने भिजवून त्यावर वर 1.5 फूट अंतर ठेऊन रोपांची लागवड करावी. एकरी झाडांची संख्या सरासरी ६५०० पर्यंत ठेवावी.
जर हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक व शेअर जरूर करा
885
5