AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
27 Feb 20, 05:00 PM
कृषि वार्ताकृषी जागरण
सोनालिकाने खास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी लॉन्च केले ‘छत्रपती’ ट्रॅक्टर
भारतात लोकप्रिय असलेल्या सोनालिका ट्रॅक्टर्सने महाराष्ट्रातील लोकप्रिय ‘छत्रपती’ ट्रॅक्टरची वाढती मागणी पाहता, खास येथील शेतकऱ्यांसाठी किसान पुणे मेळाव्यात डिझाइन केलेले छत्रपती ट्रॅक्टर पुन्हा लॉन्च केले आहे.
या कंपनीने आपल्या उत्कृष्ट कामगिरी असलेल्या सिकंदर सीरीजव्दारे, Rx 55 सिकंदरने 4087cc सीसीचे हेवी-ड्यूटी मायलेज इंजिनबरोबर 230 nm चे टॉर्क आणि Rx 47 सिकंदरसोबत 4WD लॉन्च केले. सिकंदर सीरिज सीसीएस वर्कस्पेस (कूल कम्फर्टेबल अन्ड स्पेसियस), एसडी हायड्रॉलिक विथ एक्सो सेन्सिंग आणि इतर बर्‍याच खास वैशिष्ट्यांसह, कमीत कमी डिझेलमध्ये जास्त ताकद व स्पीड असलेले हे ट्रॅक्टर लॉन्चसाठी सज्ज झाले आहे. यावेळी सोनालिका ग्रुपचे अध्यक्ष व डेप्युटी सीईओ विवेक गोयल म्हणाले, “सातत्याने नवनवीन तांत्रिक सुधारणा व नाविन्यपूर्ण क्षेत्राद्वारे राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध गरजा पूर्ण करण्यावर आमचा भर आहे. या कारणाने आम्हाला जागतिक स्तरावर 10 लाखाहून अधिक शेतकर्‍यांचा विश्वास मिळविण्यात मदत झाली आहे. महाराष्ट्रातील वाढती मागणी पाहता, आम्ही छत्रपती ट्रॅक्टर पुन्हा लॉन्च केले आहे. आम्हाला विश्वास आहे की, शेतकरी नक्कीचे याचे कौतुक करतील. आमचे उद्दीष्ट कमीत कमी खर्चात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हे आहे. यासाठी आम्ही रोटोवेटरसारखे अवजारे प्रदान करतो. यासाठी आम्हाला शासनाने निवडले असून, २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी आम्ही नीती आयोगासोबत योगदान देणार आहे." संदर्भ – कृषी जागरण, 19 डिसेंबर 2019 जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
661
0