AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
28 Feb 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
भुईमूग पिकातील पिवळेपणा कमी करण्यासाठी तसेच गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यासाठी
भुईमूग पिकाची तेलवर्गीय पीक म्ह्णून मोठ्या प्रमाणात उन्हाळी आणि खरिफ हंगामात पेरणी केली जाते. त्यामुळे दाण्यांमधील तेलाचे प्रमाण वाढवण्यासाठी गंधक हे अन्नद्रव्य महत्वाचे आहे. भुईमूग पिकास गंधक अथवा लोह कमी पडल्यास पिकास भुरकट पिवळेपणा दिसून येतो. त्यामुळे भुईमूग पेरणी करताना पहिल्या खतांच्या मात्रासोबत गंधक 90 % @ 3 किलो प्रति एकर जमिनीतून द्यावे तसेच. पीक वाढीच्या अवस्थेत चिलेटेड फेरस 12 % @ 0.75 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. तसेच कीड व रोग नियंत्रित ठेऊन पिकात वापसा राहील यापद्धतीने पाण्याचे नियोजन करावे. जेणेकरून भुईमूग पिकात पिवळेपणाची समस्या येणार नाही तसेच दाण्यामध्ये तेलाचे प्रमाण वाढून उत्पादनात भर पडेल.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
96
21