AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
24 Feb 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
द्राक्षे पिकातील मणी तडकणे समस्येवर उपाययोजना
द्राक्ष पीक सध्या पक्वतेच्या अवस्थेत असून त्यामध्ये फुगवण होत असताना मण्यांना तडे जाण्याच्या समस्या आढळून येत आहे. यामध्ये फळाचे साल मजबूत नसेल तर ढगाळ वातावरणात आणि पिकात पाण्याचा वापर जास्त झाल्यामुळे जमिनीत वापसा अवस्था राहत नाही त्यामुळे पिकातून बाष्पीभवन आणि प्रकाश संश्लेषण क्रिया पानांद्वारे मंदावल्यामुळे मण्यांना तडे जाण्याच्या समस्या येतात. यावर उपाय म्हणून द्राक्षे पिकात पाण्याचे नियोजन जमिनीच्या प्रकारानुसार वापसा राहील यापद्धतीने करावे तसेच फवारणीसाठी सिलिकॉन 3 %@ 1 मिली व ग्रीन मिऱ्याकल उत्पादक @ 2 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. स्थानिक बाजारपेठ मध्ये विक्री करावयाची असलेल्या प्लॉट मधेच फक्त फवारणी करू शकतो
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
3
0