AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
22 Feb 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कलिंगड पिकातील फळमाशीसाठी नियंत्रणासाठी उपाययोजना
कलिंगड पिकात फळांची सेटिंग झाल्यावर त्यावर फळाशीचा प्रादुर्भाव होतो. फळांना डंक मारल्यामुळे फळ वाकडे होऊन त्याचा पुढे विकास होत नाही. यावर उपाययोजना म्हणून सुरुवातीला काकडीवर्गातील पीक लागवड केलेले शेत पुन्हा कलिंगड लागवडीसाठी निवडू नये तसेच आधीच्या पिकाचे अवशेष शेतातून नष्ट करावे. शेवटी कलिंगड पिकात फुले लागताच कामगंध सापळे एकरी ५ ते १० लावावे. जेणेकरून फळमाशीचा नरपतंग त्यामध्ये अडकून नियंत्रित केला जाईल. तसेच फळांचे होणारे नुकसान टाळले जाईल.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
126
29