AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
21 Feb 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
भेंडीच्या फळाची गुणवत्ता सुधारण्यासाठी
भेंडी मध्ये अळी किंवा थ्रिप्स किडीचा प्रादुर्भाव झाल्यास तसेच अन्नद्रव्ये व्यव्थापन संतुलित प्रमाण नसेल आणि फळांच्या वाढीच्या वेळी पिकास पाणी कमी पडल्यास भेंडी पिकात फळ वाकडे होणे तसेच फळे तोडण्यासाठी कठीण जाणे ह्या समस्या येतात. यावर उपाय म्हणून थ्रिप्स व अळी सुरुवातीपासूनच नियंत्रण करून पिकात बोरॉन 20 % @ 1 ग्रॅम व चिलेटेड कॅल्शिअम 10 % @ 0.75 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी आणि पिकात वापसा राहील यापद्धतीने पाणी द्यावे. जेणेकरून फळाची गुणवत्ता सुधारेल तसेच फळे तोडण्यास सोपे जाईल.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
37
10