AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
19 Feb 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
संत्रावरील अवकाळी पाऊस व त्यावरील बचाव
विदर्भातील अमरावती व ईतर जिल्ह्यांत नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे संत्रा बागांचे नुकसान झाले आहे. सध्याच्या काळात आंबिया बहाराची योग्य नियोजन करावे. आंबिया बहरातील झाडावर या वेळी ढगाळ वातावरणामुळे नवीन पालवी येण्याच्या वेळी सिट्रस सायला या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होतो. या किडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड 0.5 मिली प्रति लिटर पाणी किंवा नॉव्हेल्युरोन 1 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणे नवीन नवतीवर फवारणी करावी. तसेच रोगग्रस्त फांद्या कापून टाकाव्यात व त्यावर त्वरीत कार्बेनडिझीम १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संत्रा झाडाला बुडाला एक मीटर पर्यंत बोर्डो पेस्ट लावावी. यामुळे झाडावर येणाया डिंक्या रोगाचे नियंत्रण होते.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
7
1