AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
17 Feb 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
डाळींब आंबे बहारातील फुलकळी निघण्यासाठी उपाययोजना
आंबे बहारात जानेवारी - फेब्रुवारी मध्ये फुले येतात. योग्य अश्या फुलधारणे साठी बागेस पाणी देताना हवामान, हंगाम व जमिनीची प्रत (प्रकार) इत्यादी बाबींचा विचार करून पाणी योग्य प्रमाणात देणे. खतांचा योग्य तसेच संतुलित प्रमाणात वापर असावा. गर्भधारणा व्यवस्थित होण्यासाठी, फुलकळी भरगच्च लागण्यासाठी अमिनो ऍसिड 2 मिली अधिक मायक्रो न्यूट्रियंट ग्रेड 2 - 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी . तसेच कळी निघायच्या अवस्थेमध्ये १२:६१:०० विद्रव्ये खत ४ किलो प्रति एकर याप्रमाणे चार दिवसांच्या आंतराने दोन ते तीन वेळा द्यावे. अशा प्रकारे नियोजन केल्यास सद्य परिस्थितीत (प्रतिकूल) गर्भ न जिरता मादी फुल संख्या ६० ते ७० % पर्यत वाढलेली निश्चितच दिसेल व फुलगळ समस्येवरदेखील व्यवस्थितपणे मात करता येईल.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
172
50