AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
08 Feb 20, 01:00 PM
कृषी वार्ताकृषी जागरण
शासनाकडे निर्यात बंदी हटविण्याची मागणी
आशिया खंडातील सर्वात मोठया बाजारपेठ असलेल्या महाराष्ट्राच्या लासलगाव येथे मोठया प्रमाणात कांदा उपलब्ध आहेत. या कारणाने कांदयाच्या किंमती कमी झाल्याचे पाहायलादेखील मिळत आहे. बाजारात जवळजवळ १८०० क्विंटल कांदे पोहचले आहेत, यामुळे कांदयाची किंमत जवळपास २,२५० रू. प्रति क्विंटल झाली आहे. यामुळे कांदा उत्पादक असलेल्या शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. यामुळे कांदयाची निर्यातबंदी हटविण्याची मागणी कांदा उत्पादक करीत आहेत. शासनाने कांदयाच्या वाढत्या किंमतीना रोखण्यासाठी निर्यातबंदी केली होती. या कारणाने महाराष्ट्रातील लासलगाव येथे कांदा बाजारपेठेत डिसेंबरमध्ये ८,६२५ रू. क्विंटलपर्यंत कांदा खरेदी झाला होता. संदर्भ - कृषी जागरण, ५ फेब्रुवारी २०२० जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
55
0