AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
03 Feb 20, 01:00 PM
कृषी वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
आता, देशी तुपाचे ब्रँडिंग करणार भारत
नवी दिल्ली: ऑलिव्ह तेल हे जगातील सर्वोत्तम आणि आरोग्यासाठी महत्वपूर्ण मानले जाते, मात्र भारत आता जगातील बाजारपेठेत उतरवून ऑलिव्ह तेलला टक्कर देण्याची योजना तयार करत आहे. पशुसंवर्धन व दुग्ध मंत्रालयाचे सचिव अतुल चतुर्वेदी यांच्या मते, योगा प्रमाणे देशी तुपाचे ही ब्रँडिंग करण्याची गरज आहे.
ते म्हणाले की, देशी तूप हे जगातील एकमेव स्वयंपाक बनविण्याचे माध्यम आहे. जे आधिककाधिक उपयोग केल्यास नुकसान होत नाही, त्यामुळे ऑलिव्ह तेलच्या तुलनेत हे उत्तम असू शकते. या संदर्भात, केंद्र सरकारने भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) वैज्ञानिकांना ऑलिव्ह तेलच्या तुलनेत देशी तूपात असणाऱ्या पोषक आणि गुणवत्तेचा तुलनात्मक अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. ज्याप्रमाणे योगाचे ब्रँडिंग केले आहे. त्याचप्रमाणे जर देशी तुपाची ब्रँडिंग केली, तर ते जागतिक बाजारपेठेत भारताचे चांगले उत्पादन बनू शकते, ज्याची निर्यात ही करू शकतो. आयसीएआरला ऑलिव्ह तेल तसेच इतर खाद्यतेल आणि देशी तुपाचा तुलनात्मक अहवाल मागितला असल्याचे चतुर्वेदी यांनी यावेळी सांगितले. संदर्भ – आउटलुक अ‍ॅग्रीकल्चर, ३१ जानेवारी २०२० जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली असेल, तर फोटोच्या खाली असलेल्या पिवळ्या अंगठ्याच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायांद्वारे आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेअर करा.
57
2