AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
03 Feb 20, 10:00 AM
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भाजीपाला काढणी व हाताळणी दरम्यान घ्यावयाची काळजी
भाजीपाल्याचे उत्पादन घेताना काढणी ही अतिशय महत्वाची बाब आहे. याची काढणी योग्य वेळी केल्यास उत्कृष्ट प्रतीचे उत्पादन मिळू शकते. त्याचबरोबर काढणी नंतरची गुणवत्ता आणि आयुष्य या गोष्टी मुख्यत्वे: भाजीपाल्याच्या परिपक्वतेवर अवलंबून असतात. या कारणामुळे भाजीपाला योग्यवेळी काढला, तरच त्याची प्रत चांगली राहते. काढणीपासून भाजीपाला बाजारपेठेत विक्रीपर्यंत अथवा घरगुती पातळीवर त्याचा उपयोग होईपर्यंत त्याची योग्य पद्धतीने हाताळणी करणे गरजेचे असते. भाजीपाला काढणीसाठी खालीलप्रमाणे निकष पाळावे. १. भाजीपाल्याची काढणी दिवसाच्या थंड वेळी म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळीच करावी. स्थानिक बाजारपेठेत भाजीपाला पाठविण्यासाठी सकाळी लवकर काढणी करावी, तर दूरवरच्या बाजारपेठेसाठी भाजीपाल्याची संध्याकाळी काढणी करावी. २. काढणीच्या वेळी तसेच काढणीनंतर भाजीपाला एकमेकांना घासला जाणार नाही याची काळजी घ्यावी. ३. भाजीपाला काढणीचे योग्य ते निकष समजून घेवून त्यानुसार काढणी करावी. पालेभाज्या, फळभाज्या कोवळ्या असतानाच काढल्या तर योग्य बाजारभाव मिळतो. म्हणून भाजीपाल्याच्या काढणीसाठी संपूर्ण माल तयार होईपर्यत न थांबता काढणीलायक माल ताबडतोब वरचेवर आणि नियमित काढून घ्यावा. ४. अशाप्रकारे मालाची प्रत तसेच गुणवत्ता राखण्यास मदत होते व साठवणुकीतदेखील माल चांगल्याप्रकारे टिकून राहतो. ५. भाजीपाल्याच्या काढणीनंतर तो एकत्र जमा करताना खरचटला तसेच आपटला जाणार नाही याची काळजी घ्यावी. कारण भाजीपाला काढणी दरम्यान तो आपटल्यास जंतूचा शिरकाव होवून ती खराब होण्याची प्रक्रिया लवकर सुरु होते व मालास दरही चांगला मिळत नाही.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
7
2