AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
01 Feb 20, 01:00 PM
कृषी वार्तादैनिक भास्कर
शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा
देशाचा २०२०-२१ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प वित्तमंत्री निर्मला सीतारामन् यांनी आज संसदेत सादर केला. शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करून २०२२ पर्यंत शेतकऱ्यांच्या उत्पन्न दुप्पट करण्यासाठी १६ विशेष कलमी कृती योजना जाहीर करण्यात आली. या योजनेसाठी २.८३ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. १. पंतप्रधान कुसुम योजने अंतर्गत २० लाख शेतकऱ्यांना सौर पंप देण्यात येईल. २. १५ लाख शेतकऱ्यांना ग्रीड कनेक्टेड पंपसेटशी जोडून घेतले जाईल. ३. उत्पादकता वाढविण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येईल, रासायनिक खतांचा वापर कमी केला जाईल, रासायनिक खतांच्या संतुलित वापरासाठी माहिती दिली जाईल. ४. देशात १६२ लाख टन धान्य साठवण क्षमता आहे. आता नाबार्ड याला जीयोटॅग करेल. तसेच धान्य साठवणीसाठी गट व तालुका स्तरावर नवीन कोठारे बांधली जातील.
५. दूध, मांस, मासे यांची साठवण व वाहतूक करण्यासाठी किसान विशेष रेल्वे धावणार. ६. शेतकऱ्यांसाठी कृषी उडाण योजना सुरू केली जाईल, ही योजना कृषी मंत्रालयाकडून दिली जाईल. ७. महिलांसाठी धान्य लक्ष्मी योजनेची घोषणा संदर्भ - दैनिक भास्कर, १ फेब्रुवारी २०२० ही माहिती पसंत पडल्यास जरूर लाइक अन् शेअर करा
76
14