AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
15 Jan 20, 01:00 PM
कृषी वार्तापुढारी
‘एनएमके – १ गोल्डन’ वाणाला मिळाले पेटंट
पुणे – कृषी व शेतकरी मंत्रालयाच्या पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क कायदा २००१ अंतर्गत सिताफळाच्या ‘एनएमके – १ गोल्डन’ या वाणाला पेटन्ट देण्यात आले आहे. तसेच, या वाणाची भारत सरकारकडे अधिकृतपणे नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती बार्शी तालुक्यातील डॉ. नवनाथ मल्हारी कसपटे यांनी दिली. सीताफळाचे पेटन्ट मिळणारे कसपटे हे देशातील पहिले शेतकरी ठरले आहेत. कसपटे म्हणाले की, गोल्डन जातीच्या सीताफळामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले असून, टिकावू, आकारने मोठे व चवीला गोड असलेल्या सीताफळाला बाजारामध्ये चांगली मागणी आहे. बार्शी येथील ३५ एकर शेतीमध्ये सीताफळाच्या तब्बल ४२ विविध वाणांची लागवड करण्यात आली आहे.
यामध्ये तब्बल ४२ विविध वाणांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल १५ एकरमध्ये केवळ सीताफळांच्या विविध जातीची नर्सरी विकसित करण्यात आल्या आहेत. गोल्डन सीताफळाचे वाण विकसित करण्यासाठी २००१ मध्ये सुरूवात केली. हे वाण विकसित करण्यासाठी १० वर्ष मेहनत व शास्त्रशुद्ध अभ्यास केला. त्यानंतर २०१० मध्ये अखेर सीताफळाचे गोल्डन वाण विकसित झाले. सीताफळाच्या इतर सर्व वाणापेक्षा जास्त उत्पादन देणारे, चवीला गोड, रंग, देखणेपणा, जास्त टिकाऊ व कमी बिया असलेले हे फळ आहे असल्याचेदेखील त्यांनी यावेळी सांगतिले. संदर्भ – पुढारी, १३ जानेवारी २०२० जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
124
3