AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
10 Jan 20, 06:00 PM
कृषि वार्ताअॅग्रोवन
‘शेतकरी सन्मान’ मधून तीन हजार कोटी जमा
पुणे : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतून राज्यातील दीड कोटी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात आतापर्यंत तीन हजार कोटी रू. थेट जमा करण्यात आले आहेत. कोणत्याही मध्यस्थांशिवाय किंवा गैरव्यवहार न होता या रकमा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्या आहेत. मात्र, चौथा हप्ता जमा करताना माहितीचा डेटा आणखी कडकपणे तपासून निधी दिला जाईल, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली. राज्याचे मुख्य सचिव मेहता यांनी अलीकडेच पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा आढावा घेतला. महसूल विभागाने कामाचा वेग वाढवावा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांची बिनचूक नोंद शेतकरी सन्मान योजनेच्या पोर्टलवर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आधीच्या नोंदी चुकीच्या असल्यास दुरूस्तीचे कामदेखील महसूल विभागानेच करायचे असल्याने राज्यात संबंधित जिल्हाधिकारीदेखील या योजनेचा सतत आढावा घेत आहेत. संदर्भ - अ‍ॅग्रोवन, ९ जानेवारी २०२० जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
29
0