AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
10 Jan 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
काकडीवर्गीय पिकांसाठी पोषक वातावरण
कलिंगड, खरबूज, काकडी व इतर काकडीवर्गीय पिकाच्या बियाणे उगवण्यासाठी साधारणतः १८ डिग्री पेक्षा जास्त तापमानाची गरज असते व वाढीसाठी साधारणतः २५ ते ३५ डिग्री तापमान लागते. भरपूर सूर्यप्रकाश व कमी आर्द्रता असल्यास या वर्गातील पिकातून उत्पादन जास्त मिळते. त्यामुळे अतिशय कमी तापमान/थंडी व किंवा अतिशय जास्त तापमानात काकडीवर्गीय पिकांची लागवड करणे टाळावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
44
0