AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
08 Jan 20, 06:00 PM
कृषि वार्ताअॅग्रोवन
पाहा, नवनिर्वाचित कृषी मंत्री यांचे ‘व्हिजन’
मुंबई: कृषीविषयक धोरणांची प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर यशस्वीरीत्या अंमलबजावणी केली जाईल, यासाठी विभागाने झोकून काम करावे. प्रत्यक्ष कृतीतून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदाचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन नवनिर्वाचित कृषीमंत्री दादा भुसे यांनी केले. कृषीमंत्रीपदाचा कार्यभार भुसे यांनी मंगळवारी स्वीकारला. कृषी आयुक्त, विभागप्रमुख, संचालक आदि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कृषीमंत्र्यांनी त्यांचे ‘व्हिजन’ स्पष्ट केले. कृषीमंत्री भुसे म्हणाले, मंत्रालयात कृषीविषयक ध्येय धोरणे, योजना आखल्या जातात. त्या प्रत्यक्ष कृतीतून शेतकऱ्याच्या बांधावर नेण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत. कृषी विभागातील योजनांचे संलग्नीकरण करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल या दृष्टीने योजना राबविल्या जातील. त्याचबरोबर कृषी विभागातर्फे प्रगतीशील शेतकऱ्यांना कृषी पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. या पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन राज्यभरातील शेतकरी बांधवांना केले जाईल. त्यातून शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल. संदर्भ - अ‍ॅग्रोवन, ८ जानेवारी २०२० जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
26
0