AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
08 Jan 20, 07:00 AM
योजना व अनुदानhttps://www.mahanews.gov.in/Home/HomeDetails.aspx?str=C4WE4UaQQfo=
योजनेचे नाव –मुख्यमंत्री कृषी व अन्नप्रक्रिया योजना
योजनेचे लाभार्थी –सर्व प्रवर्गातील शेतकरी योजनेचे उद्दिष्ट: – • शेतीमालाचे मूल्यवर्धन करण्यासाठी शेतकरी सहभागाद्वारे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प स्थापित करण्यास तसेच प्रकल्पांच्या आधुनिकीकरणास प्रोत्साहन देणे • अन्न प्रक्रियेद्वारे उत्पादित मालास ग्राहकांची पसंती, बाजारपेठ निर्माण करणे व निर्यातीस प्रोत्साहन देणे • कृषि व अन्न प्रक्रियेसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणे • तसेच ग्रामीण भागात लघु व मध्यम अन्न प्रक्रिया उद्योगांना प्राधान्य देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. • राष्ट्रीय अन्न प्रक्रिया अभियानांतर्गत मजूर, भौतिकदृष्ट्या उत्पादन सुरू असलेल्या तथापि अनुदान प्रलंबित असणाऱ्या प्रकल्पांना उर्वरित देय अनुदानाची रक्कम मंजूर करणे. लाभाचे स्वरूप - ही योजना सन २०१७-१८ या आर्थिक वर्षापासून पुढील पाच वर्षांसाठी १००% राज्यपुरस्कृत योजना आहे. प्रतिवर्षी किमान ५० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद या योजनेसाठी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. समाविष्ट पिके- सर्व पिके संपर्क कार्यालयाचा पत्ता –मंडळ कृषी अधिकारी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय राज्य –महाराष्ट्र संदर्भ: https://www.mahanews.gov.in/Home/HomeDetails.aspx?str=C4WE4UaQQfo=
23
0