AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
06 Jan 20, 06:00 PM
हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
राज्यात थंडीचे प्रमाण सामान्य राहील
राज्यात आठवडयाच्या पहिल्याच दिवशी मध्यापासून थंडीचे प्रमाण अधिक, तर सह्याद्री पर्वत रांगापासून मध्यपर्यंत थंडीचे प्रमाण कमी राहील. त्यामुळेच उत्तर राज्याच्या पूर्व भागावर, विदर्भावर व मराठवाडयात तसेच पश्चिम राज्याच्या पूर्व भागात थंडीचे प्रमाण अधिक राहील. मात्र ७ जानेवारीपासून पुढे संपूर्ण राज्यावरील हवेचा दाब १०१४ हेप्टापास्कल राहिल्यामुळे थंडीचे प्रमाण सामान्य राहील. १० जानेवारीस पुन्हा थंडीत वाढ होईल. याशिवाय विदर्भातील अकोला, यवतमाळ, नागपूर, गडचिरोली, गोंदिया तसेच मराठवाडयातील जालना जिल्हयात अल्पशा पावसाची शक्यता आहे. हवामान बदलाचा प्रभाव हिवाळी हंगामावर जाणवत आहे. केवळ नाशिक व गोंदिया जिल्हयात पारा १० अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल.
कृषी सल्ला: १. १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या काळात भेंडी, दोडका, गवार, कलिंगड, ऊन्हाळी भुईमूग, ऊस या पिकांची लागवड करण्यासाठी जमिनीची पूर्व मशागत करावी. नांगराची पाळी देऊन योग्य प्रमाणात शेणखत घालून कुळवाची पाळी द्यावी. त्यानंतर रानबांधणी केल्यानंतर योग्य वेळेवर लागवड करावी. २. कांदा पिकावरील करपा रोगाचे व फुलकिडीचे वेळीच नियंत्रण करावे. ३. हंगाम बदलताना जनावरांना पशुवैदयकीय तंज्ञाकडून रोग प्रतिबंधक लसीकरण करावे. संदर्भ – जेष्ठ कृषी हवामान तंज्ञ डॉ. रामचंद्र साबळे जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
30
0