AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
05 Jan 20, 06:00 PM
कृषि वार्ताअॅग्रोवन
खानदेशाची केळी निर्यातीत आघाडी
केळीने जगात जळगावला मोठी ओळख दिली आहे. ही ओळख टिकवून वाढत्या केळी लागवडीमध्ये आखाती राष्ट्रांमधील केळीची बाजारपेठ कष्टी, जिद्दी शेतकऱ्यांनी मिळविली आहे. केळी निर्यातीमध्ये जळगाव जिल्हयाने मागील तीन वर्षात केलेली कामगिरी लक्षवेधी अशीच ठरली आहे. केळी लागवडीमध्ये जळगाव जिल्हा
राज्यात आघाडीवर आहे. परंतु, केळीची लागवड राज्यभर वाढत आहे. मागील १० वर्षात केळीची लागवड २५ ते ३० हजार हेक्टरने वाढली आहे. अलीकडे ९५ हजार हेक्टरवर राज्यात केळी लागवड होऊ लागली आहे. जळगाव जिल्हयात दरवर्षी ४५ ते ५० हजार हेक्टरवर केळीची लागवड केली जाते. याचवेळी केळीचे कमी उत्पादन घेणाऱ्या गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेशातही केळी घेतली जात आहे. देशात सर्वत्र केळीचे उत्पादन घेतले जात असल्याने जळगावच्या केळीचा उत्तरेकडील पंजाब, हरियाना, दिल्ली, काश्मिरातील दबदबा काहीसा कमी होऊ लागला. संदर्भ - अ‍ॅग्रोवन, १ जानेवारी २०२० जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
23
0