AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
04 Jan 20, 06:00 PM
कृषि वार्ताअॅग्रोवन
साखरेसाठी खुली होणार बांगलादेशाची सीमा
कोल्हापूर – भारताचा शेजारी असलेल्या बांगलादेशाने भारतातून साखर आयातीसाठी रस्ता वाहतुकीव्दारे आपल्या सीमा खुल्या केल्या आहेत. या मार्गाने साखरेची निर्यात झाल्यास देशातील कारखान्यांना निर्यातीसाठी येणारा मोठा खर्च वाचण्याची शक्यता आहे. प्रचलित नियमानुसार जलवाहतुकीव्दारे निर्यात होणाऱ्या साखरेसाठीच अनुदान मिळते. रस्ता मार्गाने होणाऱ्या साखरेसाठी अनुदान दिल्यास याचा मोठा फायदा कारखान्यांना होऊ शकतो. बांगलादेशाला सध्या २७ लाख मेट्रिक टन साखरेची गरज आहे.
ही गरज भारत भागवू शकतो. परिणामी दूरच्या देशात होणाऱ्या निर्यातीसाठी येणाऱ्या खर्चात बचत होऊ शकते. सध्या देशात निर्यात करार वेगाने होत आहेत. बांगलादेशाला यामार्गे साखर निर्यात झाल्यास निर्यात सुलभ होऊन स्टॉकही लवकर संपू शकतो. संदर्भ - अ‍ॅग्रोवन, २ जानेवारी २०२० जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
22
0