AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
02 Jan 20, 06:00 PM
कृषि वार्ताकृषी जागरण
पीक विमा योजनेसंदर्भात शेतकऱ्यांमध्ये अधिक जागृती निर्माण करावी
मुंबई: प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुर्नचित ‘हवामानावर आधारित फळपीक विमा योजना’ सन 2018-19 या सालासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांनी विम्याचा लाभ द्यावा, असे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी कृषी विभाग आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले. विधानभवनात आज अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारींबाबत समस्यांचे निराकरण करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनीही यासंदर्भात अधिक माहिती दिली.
पटोले म्हणाले, पीक विमा योजनेसंदर्भात शेतकऱ्यांमध्ये अधिक जागृती निर्माण करायची गरज असून, संबंधित विभागाने त्यासंदर्भात कारवाई करावी. हवामानावर आधारित फळपीक विमा योजना रब्बी हंगाम 2018 अंबिया व मृगबहाराची नुकसान भरपाई जास्तीत जास्त शेतकऱ्यांना देण्यात यावी. तसेच जे शेतकरी पाहणी न झाल्याने आणि कमी तापमान या निकषावर नुकसान भरपाईपासून वंचित राहिले अशा शेतकऱ्यांनाही न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीने पीक विम्याची भरपाई द्यावी, असे निर्देश पटोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. संदर्भ – कृषी जागरण, 31 डिसेंबर 2019 जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
22
3