कृषि वार्तापुढारी
राज्यात होणार १२ हजार कांदा चाळींची उभारणी
पुणे – राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत २०१९-२० या आर्थिक वर्षात १०२ कोटी ६२ लाख ९० हजार रूपयांचे अनुदान उपलब्ध होणार आहे. त्यातून राज्यात १२ हजार ८०४ नव्या कांदा चाळी उभारण्यात येणार आहेत. ज्यातून ३ लाख मेट्रिक टन कांदयाची साठवणूक क्षमता निर्माण होईल. त्यानुसार जिल्हानिहाय कांदा चाळीचा लक्ष्यांक देण्यात आला असून, तशा सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. कांदा चाळ उभारणीसाठी राष्ट्रीय कृषीविकास योजनेतून सन २०१८-१९ मधील शिल्लक असलेला ४२ कोटी ६२ लाख ९० हजार व सन २०१९-२० साठी मंजूर प्रकल्प ६० कोटी मिळून एकूण १०२ कोटी ६२ लाख ९० हजार रू. अनुदान निधीचा कार्यक्रम मंजूर करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून प्राप्त २७ व्या राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीच्या १८ जुलै २०१९ रोजी झालेल्या बैठकीत ही मंजूरी देण्यात आली. कांदाचाळ उभारणीसाठी जिल्हानिहाय प्राप्त अर्जांची संख्या पाहता राज्यांतून एकूण १ लाख ४२ हजार ७२४ अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यामधून लॉटरी पध्दतीने अर्ज अंतिम करण्यात येऊन जिल्हानिहाय कांदा चाळ लक्ष्यांक निश्चित करण्यात आला आहे. संदर्भ – पुढारी, २९ जुलै २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
11
0
संबंधित लेख