कृषि वार्ताकृषी जागरण
पाहा, काय आहे ‘निम प्रकल्प’
मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांना कडुनिंबाचे सेंद्रिय कीटकनाशक उपलब्ध करून देण्यासाठी विविध तालुक्यांमध्ये निम पार्क तयार करण्यात येणार असून, यासाठी पायलट प्रोजेक्ट राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ५०० हेक्टर रिक्त जागेवर सर्वाधिक कडुनिंबाच्या झाडांची लागवड करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. यापासून बनविणाऱ्या निंबोळी तेलाचा शेतकऱ्यांना निश्चितच मोठा फायदा होईल असे प्रतिपादन कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी मंत्रालयात निम पार्क तयार करण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांबाबत असलेल्या बैठकीमध्ये केले. बोंडे म्हणाले, निमझाडांची रोपवाटिका तयार करून वृक्ष लागवडीसाठी सर्वप्रथम जिल्हा स्तरावर उपलब्ध रिक्त जागेची पाहणी करण्यात यावी. त्यासोबतच ज्या निम झाडांमधून दर्जेदार व मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळेल व जी प्रजाती महाराष्ट्रातील वातावरणात चांगल्या प्रकारे वाढेल अशाच प्रजातीची निवड करण्यात यावी असे ही काही मुद्दे त्यांनी बैठकीत सांगितले. संदर्भ – कृषी जागरण, २६ जुलै २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
12
0
संबंधित लेख