कृषि वार्ताअॅग्रोवन
पशुसंवर्धन विकासासाठी मिळणार निधी
कोल्हापूर: राज्यातील पशुसंवर्धन विकासाला बळ देण्यासाठी ७०० कोटी रूपयांची वाढीव निधी लवकरच मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील दुग्धोत्पादनाबरोबरच पशुसंवर्धनाला बळ मिळेल, असे मत पशुसंवर्धन व दुग्धव्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्रात पशुसंवर्धन संस्थांना आयएसओ प्रमाणपत्रवाटपाच्या वेळी व्यक्त केले. जानकर म्हणाले, राज्यातील जनावरांवर आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उपचार व्हावेत, तसेच उपचारपूर्वक सुविधा ग्रामीण दुर्गम भागातील जनावरांपर्यंत पोचाव्यात, पशुसंवर्धन विभागाचे उपक्रम, योजनांचा प्रत्येक पशुपालकाला लाभ मिळावा, यासाठी या विभागाला वाढीव निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील दुध व्यवसाय व पशुसंवर्धन अधिक सक्षम करण्यास मदत होईल. संदर्भ – अॅग्रोवन, २२ जुलै २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
10
0
संबंधित लेख