कृषि वार्तालोकमत
पीक विमा योजनेला पाच दिवसांची मुदतवाढ
मुंबई: खरीप हंगाम २०१९ मध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेत राज्यातील सर्व कर्जदार बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता यावे, यासाठी २९ जुलैपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ दिल्याची माहिती कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी बुधवारी दिली. या योजनेत सहभागी होण्यासाठी बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे विमा अर्ज बॅंक व आपले सरकार सेवा केंद्र (डिजिटव सेवा केंद्र) येथे स्वीकारण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी पीक विमा संरक्षण मिळण्यासाठी या मुदतीपूर्वी जवळची बॅंक व आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह आणि आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावा, असे कृषी विभागाने कळविले आहे. संदर्भ – लोकमत, २५ जुलै २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
18
0
संबंधित लेख