कृषि वार्तापुढारी
राज्यात इथेनॉल निर्मितीचा पहिला प्रकल्प ‘या’ ठिकाणी उभारणार
कोल्हापूर: केंद्रशासनाच्या इथेनॉल निर्मितीच्या धोरणाला अनुसरून भारत पेट्रोलियम कॉपोर्रेशन लिमिटेड ही शासन अंगीकृत संस्था भाताच्या पेंढयापासून इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभारण्याची तयारी करीत आहे. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प असून, भातासाठी प्रसिध्द असलेल्या भंडारा जिल्हयातील मकरधोकडा येथे तो उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १,५०० कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. ७०० टन जैव इंधन तयार करण्याचा हा प्रकल्प एक वर्षामध्ये कार्यान्वित होईल, असे नियोजन करण्यात आले आहे. भारतामध्ये कच्चा तेलाची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. या पदार्थाच्या आयातीसाठी देशाच्या तिजोरीवर परकीय चलनाचा मोठा ताण पडतो आहे. हा ताण कमी करून इंधनाच्या पातळीवर स्वयंपूर्ण होण्याकरिता भारत सरकारने सौरऊर्जा, इथेनाल निर्मिती व वीज या तीन ऊर्जास्त्रोतांवर अधिक भर दिला आहे. संदर्भ – पुढारी, २१ जुलै २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
3
0
संबंधित लेख