AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
21 Jul 19, 06:00 PM
कृषि वार्ताकृषी जागरण
राज्यात खरीपाच्या पेरणीचे प्रमाण ५४ टक्के
मुंबई: राज्यात खरीपाची ८०.६१ लाख हेक्टर क्षेत्रावर (५४ टक्के) पेरणी झाली असून ९२ तालुक्यांत १०० टक्केपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. सुमारे १७ जिल्ह्यांत ५० ते ७५ टक्के पाऊस झाला असून सात जिल्ह्यांमध्ये १०० टक्केपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले. कृषीमंत्री म्हणाले, राज्यात १२ जुलैपर्यंत ३७९ मिमी पाऊस झाला आहे. राज्याच्या ३५५ तालुक्यांपैकी २८ तालुक्यांमध्ये २५ ते ५० टक्के, १३७ तालुक्यांमध्ये ५० ते ७५ टक्के, ९८ तालुक्यांत ७५ ते १०० टक्के आणि ९२ तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र १४९.७४ लाख हेक्टर क्षेत्र असून ८०.६१ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कोकण व पुणे विभागात अनुक्रमे ३६ हजार ३५५.२९ हेक्टर तर ४ हजार ९२९.०७ हेक्टर क्षेत्रावर भात रोपवाटिकेतील पेरणीची कामे झाली आहे. राज्यात पुणे व लातूर विभागात काही ठिकाणी पिकांच्या वाढीसाठी पावसाची आवश्यकता असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले. संदर्भ – कृषी जागरण, १८ जुलै २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
0
0