AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
20 Jul 19, 06:00 PM
कृषि वार्ताकृषी जागरण
कर्जमाफी योजनेअंतर्गत एकरकमी परतफेडीसाठी मुदतवाढ
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफीची प्रक्रिया सुरु आहे. यात एकरकमी परतफेड योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हिश्श्याची रक्कम भरण्यासाठी ३१ ऑक्टोबर २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. एक रक्कम परतफेड घटकामध्ये ज्या पात्र लाभार्थ्यांची योजनेमध्ये मंजूर केलेली रक्कम रु. १.५० लाखाच्या वर आहे, अशा शेतकऱ्यांना रुपये १.५० लाखावरील त्यांच्या हिश्श्याची रक्कम भरल्यानंतर योजने अंतर्गत रुपये ४.५० लाखाच्या मर्यादेपर्यंत कर्जमाफी देण्यात येते. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये सद्यस्थितीत सुमारे ५० लाख खातेदारांना २४ हजार ३१० कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहेत. आतापर्यंत सुमारे ४४ लाख खातेदारांना १८ हजार ५०० कोटींचा लाभ देण्यात आला आहे असेही देशमुख यांनी सांगितले. सदर योजनेचा जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. जेणेकरुन त्यांना चालू खरीप हंगामामध्ये पिककर्ज घेणे सुकर होईल असे आवाहनदेखील सहकारमंत्री देशमुख यांनी केले. संदर्भ – कृषी जागरण, १७ जुलै २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
15
0