कृषि वार्ताकृषी जागरण
फलोत्पादन योजनांसाठीच्या निधीत वाढ करणार
पंढरपूर: पारंपरिक शेतीबरोबरच फलोत्पादनाकडे शेतकऱ्यांनी वळायला हवे. फलोत्पादनामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावतो. त्यामुळे फलोत्पादनाच्या योजनांसाठी निधीत वाढ केली जात असल्याची माहिती फलोत्पादन आणि रोजगार हमी योजनामंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी भंडीशेगाव येथे फलोत्पादन विभागाच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या चित्ररथांच्या उद्घाटनावेळी दिली. क्षीरसागर म्हणाले, मागेल त्याला शेततळे योजनेला आता ९५ हजार अनुदान दिले जाईल. यापूर्वी केवळ पन्नास हजार रुपये दिले जात होते. शेतरस्ते जोडण्यासाठी महत्त्वाची योजना आखण्यात आली आहे. एक किलोमीटरचा रस्ता करण्यासाठी दोन लाख रुपयांचे अनुदान दिले जाईल. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत आणखी अठ्ठावीस प्रकारच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे. संदर्भ – कृषी जागरण, ११ जुलै २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
4
0
संबंधित लेख