कृषि वार्ताकृषी जागरण
संत्रा लागवडीला देणार चालना
बई: विदर्भाचे मुख्य फळपिक संत्र्याच्या लागवडीला चालना देण्यासाठी नाविन्यपूर्ण संत्रा धोरण तयार करुन राबविण्यात येणार आहे. संत्रा लागवडीला चालना देण्यासह उत्पादकांना योग्य भाव मिळवून देण्यासाठी शेतकरी घटक मानून सर्वंकष पॅकेज तयार करण्यात येईल, अशी माहिती कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी संत्रा धोरणाच्या बैठकीमध्ये दिली. बोंडे म्हणाले, संत्रा पिकांच्या लागवडीसाठी कलमे आणि नव्या तसेच जुन्या बागांना पुनर्विकास, लघु आवेष्टन गृह (पॅकेजिंक हाऊस) आदींसाठी पॅकेज तयार करण्यात येईल. हे पॅकेज तयार करण्यासाठी १ ते २ हेक्टरपर्यंतचे क्षेत्र घटक मानण्यात येईल. नवीन लागवड आणि जुनी लागवड यासाठी वेगवेगळे निकष या पॅकेजमध्ये असतील. नर्सरी बागांची निर्मिती, मोठे पॅकेजिंग युनिट आदी मोठ्या बाबींसाठी शेतकरी गटांना मदत दिली जाईल. संदर्भ – कृषी जागरण, १० जुलै २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
5
0
संबंधित लेख