कृषि वार्ताकृषी जागरण
शेतकऱ्यांच्या उत्पादनासाठी विक्री व्यवस्था निर्माण करणार
मुंबई: महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ आणि मुंबई सहकारी संस्था यांच्यामध्ये सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या व बचतगट यांनी शेतकऱ्यांनी तयार केलेल्या उत्पादनांना विक्री व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. मंत्रालयात महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ आणि अपना बाजार, सहकारी भांडार व कळवा सहकारी बाजार यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला._x000D_ राज्यातील विविध सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी बचत गट यांनी तयार केलेल्या दर्जेदार उत्पादनांचे महामंडळामार्फत मार्केटिंग केले जात आहे. यापूर्वी पंजाब मार्कफेड येथे अशा संस्थांसोबत सदर उत्पादने विक्रीस उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. महाफार्म उत्पादनांमध्ये हळद पावडर, काजू पूर्ण, काजू तुकडा, कांदा लसुण मसाला, कोल्हापुरी मसाला, काळा मसाला, काळा मनुका इत्यादी उत्पादनांचा समावेश आहे. भविष्यात अजूनही जास्त उत्पादने बाजारात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे, असेही देशमुख यांनी सांगितले._x000D_ संदर्भ – कृषी जागरण, १० जुलै २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
9
0
संबंधित लेख