मान्सून समाचारडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
या आठवडयात पावसाची उघदीप
राज्यात १३ व १४ जुलैला चांगल्या पावसाची शक्यता आहे. १५ ते १९ जुलै या काळात पावसात उघदीप राहणे शक्य असून अत्यंत तुरळक ठिकाणी अल्पशा: पावसाची शक्यता आहे. या आठवडयात सुरूवातीच्या काळात कोकणात पावसाचा जोर कायम राहून रत्नागिरी व रायगड जिल्हयात ५४ ते ६४ मिमी, ठाणे व सिंधुदुर्ग जिल्हयात ३५ ते ४० मिमी पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्हयात काही दिवशी ८ मिमी तर धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्हयात ३ ते ५ मिमी पावसाची शक्यता आहे. मराठवाडयातील हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्हयात २ ते ५ मिमी तर उर्वरित जिल्हयात ८ ते १० मिमी पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हयात काही दिवशी ३० मिमी तर सातारा व पुणे जिल्हयात १२ ते १५ मिमी पावसाची शक्यता आहे. उर्वरित जिल्हयात ४ ते ६ मिमी पावसाची शक्यता आहे. विदर्भात बुलढाणा, अमरावती, चंद्रपूर, भंडारा जिल्हयात १० ते १५ मिमी व उर्वरित जिल्हयात अल्पशा: पावसाची शक्यता आहे. कृषी सल्ला: १. ज्वारी, बाजरी, मका या पिकांना नत्र खताचा दुसरा हप्ता दयावा. २. पावसाची उघदीप होताच खुरपणी व कोळपणी करून उभ्या पिकातील तणे काढून घ्यावीत. ३. जिथे पाऊस अधिक झाला आहे व जमिनीत ६५ मिमीपेक्षा अधिक ओलावा आहे, तिथे वापसा येताच सोयाबीन व घेवडा पिकांच्या रखडलेल्या पेरण्या उऱकून घ्यावात. ४. फळबाग लागवडीचे काम पूर्ण करावे व लागवड केलेल्या रोपाना पावसात उघडीप होताच पाणी दयावे. संदर्भ – जेष्ठ कृषी हवामान तंज्ञ डॉ. रामचंद्र साबळे
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
82
0
संबंधित लेख