कृषी वार्तालोकमत
राज्यातील प्रत्येक तालुक्यात उभारणार कृषी भवन – बोंडे
अकोला: कृषी संबंधित योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीकोनातून कृषी सहायकांनी ग्रामपंचायत कार्यालयात बसूनच काम करावे. यासाठी त्यांच्या कामाचे वेळापत्रक तयार करून याबाबत कार्यवाही त्वरित करण्यात यावी. अधिकाऱ्यांनी शेतावर जावे, शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जागेवरच सोडवाव्यात. यासाठी कृषी सहायकांना बसण्यासाठी ग्रामपंचायतने कार्यालय उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले जातील तसेच प्रत्येक तालुक्यामध्ये कृषी भवन उभारण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी कृषी विदयापीठात शनिवारी आयोजित खरीप हंगाम समन्वय कार्यशाळेच्या उद्घाटनावेळी दिली. बोंडे म्हणाले, कृषीचे ज्ञान घेण्यासाठी शेतकरी कृषी विदयापीठात आले पाहिजेत. कृषी विदयापीठाचा संशोधनाचा, अवजारांचा, प्रयोगांचा उपयोग शेतकऱ्यांना करून दिला पाहिजे, संशोधनाबरोबरच कृषी विदयापीठाने व्यावसायिक बनले पाहिजेत. त्याचबरोबर कृषी विदयापीठातील मजुरांच्या समस्या, रिक्त पदाची समस्या महिन्याच्या आत सोडविण्याचे आश्वासन दिले आणि कृषी विदयापीठाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करावेत, त्यासाठी उत्पादन खर्च कसा कमी करता येईल, याचा विचार कृषी संशोधनकांनी करावा. संदर्भ – लोकमत, ७ जुलै २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
3
0
संबंधित लेख