AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
09 Jul 19, 06:00 PM
कृषि वार्ताप्रभात
राज्यात पाच कोटी रेशीम रोपांची होणार लागवड – मुनगंटीवार
मुंबई- राज्यात जुलै ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत ३३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प असून यामध्ये ५ कोटी १३ लाख तुतीच्या रोपांची (रेशीमरोपांची) लागवड होणार आहे. यातून शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीबरोबर रोजगाराची संधीही मिळणार आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. मुनगंटीवार म्हणाले, दुग्ध व कुक्कुटपालन व्यवसायसारखाच रेशीम शेती हा शेतीस पूरक आहे. हा व्यवसाय अत्यंत कमी खर्चात व उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येतो. शेतकऱ्यांना कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पन्न मिळवता येते. तुतीस एप्रिल, मे महिन्यात पाणी मिळाले नाही तरी तुती मरत नाही. पाणी मिळाल्यानंतर तुती पुन्हा जोमाने वाढते. यामुळे कमीत कमी बागायत क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांपासून ते जास्तीत जास्त बागायत क्षेत्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांना हा व्यवसाय चांगल्या रितीने करता येतो हे लक्षात घेऊन वृक्षारोपण कार्यक्रमात तुती लागवडीला प्रोत्साहन देण्यात आले आहे. संदर्भ – प्रभात, ८ जुलै २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
3
0