AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
06 Jul 19, 02:00 PM
मान्सून समाचारडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
आठवडाभर अल्प व मध्यम पावसाची शक्यता
महाराष्ट्रातील ज्या भागावरील हवेचे दाब कमी होतील, त्या भागात पावसाची शक्यता आहे. त्यामुळेच मध्य महाराष्ट्रावर व पूर्व भागात पावसाची शक्यता राहील. तिच स्थिती १२ जुलैपर्यंत राहील. त्यामुळे राज्यात ७,९,१०,१३ जुलै पावसाची शक्यता आहे. एकूणच पावसाचे प्रमाण पाहता जून महिन्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला असल्याने या आठवडयात होणारा पाऊसही फारसा समाधानकारक राहणार नाही. अदयापही मान्सून पावसाला जोर नसल्यामुळे हवामान स्थिती अदयापही समाधानकारक नाही.
कृषी सल्ला: सिताफळ, आवळा, अंजीर, पपई, जांभूळ व लिंबू लागवड फायदयाची राहणार आहे. संदर्भ – जेष्ठ हवामान तंज्ञ डॉ. रामचंद्र साबळे राज्य - महाराष्ट्र जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
81
0