कृषि वार्ताअॅग्रोवन
खरीप हमीभावात वाढ
केंद्र सरकारने यंदाच्या खरीप हंगामासाठी (२०१९-२०) प्रमुख पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ केली आहे. सोयाबीन प्रतिक्विंटल ३७४८ रू. आधारभूत किंमत जाहीर करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ३११ रू. वाढ मिळाली आहे. तूर, मूग व उडीद यांच्या आधारभूत किंमती अनुक्रमे ५८००, ७०५० व ५७०० रू. जाहीर करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत १२५, ७५ व १०० रू. वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी या पिकांना २२५, १४०० व २००० रू. वाढ मिळाली होती.
मक्यासाठी यंदा प्रतिक्विंटल १७६० रू. आधारभूत किंमत जाहीर करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ६० रू. वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी २७५ रू. वाढ मिळाली होती. सरकारी खरेदीच्या दृष्टीने सर्वात महत्वाचे खरीप पीक असलेल्या भाताच्या आधारभूत किंमतीत केवळ ३.७ टक्के वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी प्रतिक्विंटल १७५० रू. आधारभूत किंमत होती. त्यात यंदा केवळ ६५ रू. वाढ करून ती १८१५ रू. करण्यात आली आहे. संदर्भ – अॅग्रोवन, ४ जुलै २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
12
0
संबंधित लेख