मान्सून समाचारलोकसत्ता
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई, उपनगर तसेच पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता पुणे येथील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच पावसाचा जोर लक्षात घेता सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांनी या काळात पर्यटनस्थळांवर जाऊ नये असे आवाहनही पुणे हवामान विभागाचे अधिकारी अनुपम कश्यपी यांनी केले आहे. कश्यपी यांनी सांगितले की, राज्याची सध्याची स्थिती अशी बनली आहे की, कालच्या तुलनेत पावसाची क्षमता आज वाढली आहे. दक्षिण-मध्य भारत, ओडिशा, झारखंड येथून मान्सून विदर्भाकडे सरकणार आहे. त्यामुळे मान्सूनचा जोर वाढणार आहे. खासकरुन उत्तर महाराष्ट्रात त्याचा मोठा प्रभाव जाणवेल. कोकण तसेच मुंबई आणि उपनगर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर एक-दोन ठिकाणी अतिवृष्टीही होऊ शकते. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ३ जुलैला सर्वदूर पाऊस पडेल. ४ जुलैच्या दुपारनंतर पाऊस कमी होताना दिसेल. ६ जुलैला उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असून हा पाऊस विखुरलेल्या स्थितीत कोसळेल. मात्र, उत्तर महाराष्ट्रात या दिवशी जोरदार पाऊस होईल. संदर्भ – लोकसत्ता, २ जुलै २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
66
0
संबंधित लेख