AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
29 Apr 19, 06:00 PM
कृषि वार्ताअॅग्रोवन
राज्यात शिल्लक अवघे ३०५ टीएमसी पाणी
पुणे: वाढत्या उन्हामुळे पाणी टंचाईची समस्या उभी राहणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यातच यावेळी राज्यातील मोठे, मध्यम आणि लहान अशा सर्व ३२६७ प्रकल्पांमध्ये ३०५.४७ टीएमसी (२१ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच तारखेला सर्व प्रकल्पांमध्ये सुमारे ३४ टक्के पाणी उपलब्ध होते. यंदा राज्यातील धरणे वेगाने रिकामी होऊ लागल्याने, पुढील काळात टंचाईची भीषणता आणखी वाढणार आहे.
विभागनिहाय पाणीसाठ्याचा विचार करता यंदा मराठवाड्यातील औरंगाबाद विभागात अवघे ५ टक्के आणि पूर्व विदर्भातील नागपूर विभागात १२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती विभागात २५ टक्के, तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक विभागात सुमारे १९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे विभागात २६ टक्के आणि कोकण विभागात ४३ टक्के उपयुक्त पाणीसाठा असल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालावरून दिसून येते. संदर्भ – अॅग्रोवन, २३ एप्रिल २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
2
1